संधी डिजिटल मीडिया शिकण्याची, 23 सप्टेंबरपासून कार्यशाळा

953
media-study

प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर डिजिटल मीडियाने मोठे आव्हान उभे केले आहे. ज्या पत्रकारांना या नव्या माध्यमाची किमान तोंडओळख आहे त्यांचे भविष्य हे उज्ज्वल आहे. या नव्या माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या देशात अत्यंत कमी संस्था आहे. काही शिक्षणसंस्थांमधून याचे शिक्षण देण्यात येत असले तरी त्यामध्ये प्रॅक्टिलचा भाग कमी असतो.

सध्या या नव्या माध्यमांमध्ये जेवढ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत तितक्या इतर दोन पारंपारिक माध्यमांमध्ये होत नाहीत. अनुभव नसल्याने आणि या नव्या माध्यमाची ओळख नसल्याने अनेक होतकरू विद्यार्थी मागे पडत आहेत. या विद्यार्थ्यांना या नव्या माध्यमाची तोंडओळख करून देण्यासाठी साठ्ये महाविद्यालयात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 23 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ही कार्यशाळा होणार असून, सध्या या माध्यमामध्ये काम करणाऱ्या अत्यंत नामवंत आणि अनुभवी पत्रकारांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याहूनही विशेष बाब ही आहे की जे विद्यार्थी या कार्यशाळेत चमकदार कामगिरी दाखवतील त्यांना नामांकित वेबपोर्टलमध्ये इंटर्नशिपची संधी मिळेल.

सध्या या माध्यमामध्ये नोकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य मिळत असल्याने हा अनुभव कार्यशाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. ही कार्यशाळा सोमवार ते शनिवार (सुट्टीचे दिवस) वगळता सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेमध्ये आयोजित केली जाणार आहे.

डिजिटल मीडियासाठी बातमी कशी लिहितात, एसईओ म्हणजे काय, डिजिटल मार्केटिंग नेमके काय असते या अत्यंत महत्वाच्या विषयांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे. वर नमूद केलेल्या विषयांसाठी खासगी संस्था लाखो रूपये फी घेत असतात. विद्यार्थ्यांना हे शिक्षण मिळावं या प्रांजळ हेतूमुळे या कार्यशाळेसाठी नाममात्र शुल्क ठेवण्यात आलं आहे. साठ्ये कॉलेजच्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांशिवाय पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या मुंबईतील सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा खुली असणार आहे. साठ्ये कॉलेजमध्ये न शिकणाऱ्या मात्र पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या इतर कॉलेजमधीलव विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेचे शुल्क हे 1200 रुपये असणार आहे. या कार्यशाळेसाठीच्या जागा मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांनी 18 सप्टेंबरपर्यंत नावे नोंदणी करून निश्चित करून घ्यावीत.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

साठ्ये महाविद्यालय- पत्रकारिता विभाग, रसिका सावंत मॅडम-9702914968 किंवा श्री-9137170876

ईमेल आयडी- [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या