डिजीटल भाषेचे ग्राहकांना वावडे; 90 टक्के ऑनलाइन खरेदी मातृभाषेतूनच

320

हिंदुस्थानातील ऑनलाईन ग्राहकांना डिजीटल भाषेचे वावडे असून 90 टक्के ऑनलाईन खरेदी मातृभाषेतूनच केली जात आहे. इंग्रजी भाषा अवगत असतानाही इंटरनेट वापरताना बहुसंख्य ग्राहक मातृभाषेचाच वापर करीत असल्याचे फ्लिपकार्टने केलेल्या एका सर्व्हेक्षणातून उघड झाले आहे.

इंग्रजी भाषेतील इंटरनेटसंबंधीचे सांकेतिक शब्द अजूनही हिंदुस्थानातील ग्राहकांना आपलेसे काटत नाहीत. डिजिटल भाषेतील शब्दप्रयोगांपेक्षा हिंदुस्थानातील ऑनलाइन ग्राहक मातृभाषेतूनच खरेदीला प्राधान्य देतात. याविषयी फ्लिपकार्टने 2019 मध्ये तब्बल सहा महिने पाहणी केली होती.

इंग्रजी-हिंदी कीबोर्डला पसंती

इंग्रजी-हिंदी कीबोर्डला सर्वाधिक ग्राहकांची पसंती आहे. तसेच उत्पादनांचे परीक्षणही ग्राहकांना मातृभाषेत वाचायला अधिक आवडते. त्यातही सोप्या बोली भाषेला 75 टक्के ग्राहकांची पसंती असते. उत्पादनांची सविस्तर माहितीही सोप्या व स्थानिक भाषेत मिळावी, अशी अपेक्षा बहुतेक ग्राहकांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या