अजंठा लेण्यांचे डिजिटलायझेशन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये दिली माहिती

हिंदुस्थानासह संपूर्ण जगाच्या आर्पषणाचे केंद्रबिंदू असणाऱया महाराष्ट्रातील अंजठा लेण्यांचा वारसा डिजीटल रुपात जतन करण्याचे महत्वपूर्ण काम सुरु असल्याची माहिती रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. यामध्ये अंजिठा लेण्याची संपूर्ण झलक पहायला मिळणार असून त्यात डिजिटलाइज्ड आणि पुन्हा स्थापन झालेल्या कलाकृती आणि दस्तावेज जतन केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये अनेक मुद्दय़ांवर सविस्तर संवाद साधला. शेतकऱयांच्या नव्या कृषी कायद्यासह कोरोना संकट आणि देशभरातील विद्यार्थी आणि माजी वर्गांला त्यांनी गुरुमंत्र दिला. तर मन की बातच्या सुरुवातीलाच त्यांनी देशवासियांना एक आनंदाची बातमी दिली. देवी अन्नपूर्णाची एक खूपच जुनी मूर्ती कॅनडातून भारतात परत आणणार असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले. ही मूर्ती सुमारे 100 वर्षांपूर्वी 1913 रोजी वाराणसीतील एका मंदिरातून चोरून देशाबाहेर नेण्यात आली होती. यानिमित्त त्यांनी कॅनडा सरकार आणि हे पुण्य कार्य यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱयांचे आभार देखील मानले.

दरम्यान, यावेळी देशभरातील विद्यापीठांमध्ये शिक्षण पूर्ण करणाऱया माजी विद्यार्थ्यांना देखील त्यांनी मोलाचा संदेश दिला. जिथे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला, त्या संस्थेच्या विकासासाठी काहीतरी करता येणं यापेक्षा आनंदाची गोष्ट आणखी काय असू शकते? आजकाल माजी विद्यार्थी याबाबतीत खूप उत्साहाने काम करताना दिसतात. या सगळ्या उपक्रमांमुळे सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव अधिक समृद्ध होत जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सेवक को सेवा बन आई

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 30 नोव्हेंबरला होणाऱया गुरुनानक देव यांच्या 551व्या प्रकाश पर्वाचा उल्लेख केला. मोदी म्हणाले की, गुरुग्रंथ साहिबमध्ये असे म्हटले आहे की, ‘सेवक को सेवा बन आई’, म्हणजे सेवकाचे काम सेवा करणे. एक सेवक म्हणून आपल्याला खूप काही करण्याची संधी मिळाल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या