शिवाजी पार्कवर दिसला ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह

डिग्निटी चाय मस्ती सेंटर-शिवाजी पार्क या सामाजिक संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी शिवाजी पार्क येथे मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आजी-आजोबांचा प्रचंड उत्साह दिसला. 15 व्या वार्षिक समारंभानिमित्त ज्येष्ठ नागरिकांनी कला सादर केली. अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले.

संस्थेचे सीईओ जावेद यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते निःशुल्क सेवा देणाऱया के. के. मनी आणि डॉ. विद्या शेणॉय यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. डिग्निटी चाय मस्ती सेंटरच्या मुख्य सहसमन्वयक आफरीन खान यांनी संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळली. अशोक पुराणिक, प्रकाश आवटे, रंजन, नीना आदी यावेळी उपस्थित होते. शुभदा, सुरेखा यांनी आभार प्रदर्शनाने वार्षिक समारंभाची सांगता झाली.