‘दिल बेचारा’…फ्रेंडझोन का मारा! अखेरच्या चित्रपटातल्या गाण्यावर सुशांतचे चाहते भावूक

648

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या मृत्युनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही, आत्महत्या की खून अशा निरनिराळ्या विषयांच्या चर्चेला उधाण आलं आहे. या दरम्यान त्याच्या अखेरच्या चित्रपटातलं गाणं प्रदर्शित झालं असून त्यातल्या सुशांतला पाहून चाहते भावून झाले आहेत.

ए. आर. रेहमान या दिग्गज संगीतकाराने हे गाणं ट्वीट केलं आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांचे असून या गाण्याला संगीत ए. आर. रेहमान यांचं आहे. रेहमान यांनीच हे गाणं गायलंही आहे. या गाण्यावर सुशांत एक स्टेज परफॉर्मन्स देत असून या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन फराह खान यांनी केलं आहे.

सुशांतच्या मृत्युनंतर प्रदर्शित होणारा हा त्याचा अखेरचा चित्रपट आहे. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतसोबत अभिनेत्री संजना सांघी झळकणार आहे. त्याच्या या अखेरच्या चित्रपटातील गाण्यावर त्याचे चाहते भावपूर्ण प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्या नृत्यकौशल्याची प्रशंसा होतानाही दिसत आहे. हा चित्रपट येत्या 24 जुलै रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे.

 पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या