
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिलीप कुमार यांच्यात चांगली मैत्री होती. शिवसेनाप्रमुखांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. ‘‘आम्ही एकत्र जुन्या ‘मातोश्री’च्या गच्चीत बसायचो. महिलांना बारशाच्या वेळी मिळतात ना त्या घुगऱया माँ तळायची. त्यात ती खोबरे आणि कोथिंबीर घालायची. मी त्यावेळी बीयर पीत होतो आणि मी गच्चीत बसायचो. दिलीप कुमारचा फोन यायचा, बाळासाहेब काय करताय? मी म्हटलं की बीयर पितोय, तर दिलीप कुमार म्हणाला येऊ का? मी म्हटलं ये आणि आम्ही दोघं गच्चीत बसायचो. त्याला ते चणे भयंकर आवडले. त्यानंतर तो फोन करून विचारायचा की चणे खायला येऊ का? मी म्हणायचो ये अशी आमची मैत्री होती.’’ अशी आठवण शिवसेनाप्रमुखांनी त्या मुलाखतीत सांगितली होती.





























































