
अमेरिकेतील मेट गाला 2025 मध्ये जगभरातील प्रसिद्ध कलाकारांचा मेळा जमणार आहे. यामध्ये शाहरुख खान, कियारा अडवाणी असे बॉलीवूड स्टार सहभागी होणार आहेत. यंदा गायक -अभिनेता दिलजीत दोसांझ हादेखील मेट गालामध्ये पदार्पण करणार आहे. दिलजीतने सोशल मीडियावर याची माहिती दिली. दिलजीतने इन्स्टाग्रामवर दोन स्टोरी पोस्ट केल्या. एका स्टोरीत त्याने फर्स्ट टाईम असे लिहिलंय, तर दुसऱ्या स्टोरीत मेट गाला लिहिलेल्या उशीचा फोटो पोस्ट केलाय. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये हा भव्य इव्हेंट होणार आहे. फॅशन जगतातील मोठा इव्हेंट आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचे आयोजन होते.