गृहनिर्माणाच्या शंकांचे निरसन, डिम्ड कन्व्हेयन्स मार्गदर्शन शिबीर संपन्न

गृहनिर्माणाच्या डिम्ड पॅन्व्हेयन्सबाबत आजही अनेकांच्या मनात साशंकता आहे. ही साशंकता दूर करण्साठी दहिसर येथे शिवसेना नगरसेवक बाळपृष्ण ब्रीद पुढे सरसावले. त्यांनी स्थानिक नागरिकांसाठी ‘डिम्ड कन्व्हेयन्स’ या विषयावर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. डिम्ड कन्व्हेयन्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यास स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या विनामूल्य मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते संपन्न झाले. असोसिएशनतर्फे सदर मोहीम यशस्वी होण्याच्या अनुषंगाने सर्व पात्र गृहनिर्माण संस्थांनी आवश्यक प्रस्ताव सादर करून मुदतीत अर्ज निकाली काढण्यासाठी या विशेष मोहिमेद्वारे लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी अॅड. अजित मांजरेकर यांनी मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेयन्स) या विषयावर तपशीलवार माहिती देऊन सर्वांच्या शंकांचे योग्य ते निरसन केले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आपली प्रतिक्रिया द्या