
मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, रुग्णालयांना भेडसावत असलेली रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी रविवारी दिंडोशी येथे आरोग्य व रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुंबईतील रक्तातील कमतरता भरून वाढण्यासाठी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दिंडोशी विधानसभेच्या कतीने शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर तसेच आमदार, विभागप्रमुख, माजी महापौर सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली आज केईएम रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने याचे आयोजन केले होते. यावेळी सरकारी कर्मचारी, पोलीस व बेस्टमधील कर्मचाऱयांनीदेखील डय़ुटी बजावून रक्तदान केले. तरुण वर्ग तसेच शिवसेना व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱयांनी यावेळी मोठय़ा संख्येने रक्तदान केले. कार्यक्रम यशस्की करण्यासाठी उपमहापौर सुहास वाडकर, विभागसंघटक विष्णू सावंत, प्रशांत कदम, सर्व नगरसेवक तसेच महिला, पुरुष उपविभागप्रमुख, उपविभाग समन्वयक विधानसभेतील एकूण 8 शाखांच्या सर्व शिवसेना-युवासेना- भा. वि. सेना व अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱयांनी व शिवसैनिकांनी विशेष सहकार्य केले.
दुर्घटनेची चौकशी, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी दुर्घटनेबाबत चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचा आदेश दिला. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाखांची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.


























































