
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस सिझन 12 ची विनर दीपिका कक्करला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच दीपिकाने तिच्या चाहत्यांसोबत एक अतिशय दुःखद बातमी शेअर केली आहे. दीपिकाला यकृताचा कर्करोग झाला असून, हा कर्करोग स्टेज दोनचा कर्करोग असल्याचे तिने सांगितले आहे. याबाबत दीपिकाने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
टेलिव्हिजन इंडस्ट्रितील कलाकारांच्या आयुष्यात सध्याच्या घडीला कठीण काळ सुरु आहे, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. याआधी अभिनेत्री हिना खानला देखील ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. यानंतर आता अभिनेत्री दीपिका कक्करही यकृताच्या कॅन्सरमुळे त्रस्त आहे. दीपिका कक्कर आणि तिचा पती शोएब इब्राहिम यांनी काही दिवसांपूर्वी एक व्लॉग करत दीपिकाच्या तब्येतीविषयी माहिती दिली होती. यानंतर मंगळवारी रात्री उशिरा अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मोठी पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांना तिच्या आजाराबद्दल माहिती दिली. तिच्या सर्व प्रियजनांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली.
दीपिका कक्करने तिच्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिले आहे की, तुम्हाला माहिती आहेच की, गेल्या काही आठवड्यांपासून मी आणि माझ्या कुटुंबाला खूप त्रास होत आहे. माझ्या पोटाच्या वरच्या भागात अनेक दिवसांपासून वेदना होत होत्या. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे आम्हाला कळले की, माझ्या यकृतामध्ये टेनिस बॉलइतका मोठा ट्यूमर आहे. आता तपासणीनंतर हे स्पष्ट झाले आहे की ही गाठ दुसऱ्या टप्प्यातील कर्करोगाची आहे, असे तिने म्हंटले आहे.
View this post on Instagram
दीपिका आता सध्या इतक्या मोठ्या आजारावर मात करत आहे तरीही ती जराही खचलेली नाहीए. “आम्ही खूप कठीण काळ पाहिला आहे. पण तरीही मी सकारात्मक आहे आणि पूर्ण धैर्याने या परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहे. मी लवकरच बरा होईन आणि यातून बाहेर पडेन. या वेळी माझे संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत उभे आहे आणि तुम्हा सर्वांचे प्रेम आणि खूप प्रार्थना देखील आमच्यासोबत आहेत. कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा.” असे तिने पोस्टमध्ये म्हंटले आहे. दीपिकाच्या या पोस्टनंतर, सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून कमेंट्सचा पूर आला. प्रत्येकजण तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत आहे.
दरम्यान दीपिकाचा नवरा शोएबने दीपिकाच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे. तिची तब्येत आता बरी आहे. तापही कमी झाला आहे. त्यामुळे तिला पुन्हा घरी आणण्यात आले आहे. दीपिकाची तब्येत अशीच राहिली तर, तिच्यावर पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया होईल, असे त्याने म्हंटले आहे.