
आषाढी एकादशीचे औचित्य साधून लक्ष्मी शिंदे या मुलीने पायाने विठुरायाचे चित्र साकारले आहे. तसेच या कोरोना संकटातून मुक्त कर असे साकडेही तिने घातले आहे.
https://youtu.be/SzJalTkTdvg
सोलापूरची चित्रकार लक्ष्मी शिंदे ही जन्मतः दिव्यांग आहे. दिव्यांग असली तरी ती उत्तम कलाकार आहे. पायाने ती उत्तमोत्तम चित्र काढते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लक्ष्मीने विठुरायाचे चित्र काढले आहे. पायांनी रेखाटलेल्या या चित्राला तिने बा…विठ्ठला या जगाला कोरोनाच्या संकटातून मुक्त कर असे साकडे घातले आणि वारकरी भाविकांनी पंढरपूरला न जाता घरीच श्री विठ्ठल रखुमाईची पूजा करावी असे आवाहनही तिने केले आहे.


























































