ओढ पंढरीची… दिव्यांगांची पायी वारी, 15 जण 35 दिवसांत करणार 400 किलोमीटरचा प्रवास

आषाढी एकादशीला वेध लागतात ते पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाचे. लाखो वारकरी पायी टाळमृदुंगाचा गजर करत पंढरीच्या दिशेने निघतात. विठुरायाच्या भक्तीत लीन झालेल्या वारकऱ्यांना कोणतीही बाधा रोखू शकत नाही. पहिल्यांदाच वाशिम येथील दिव्यांग वारकरी संत सूरदास महाराज दिव्यांग वारकऱ्यांचा पायी पालखी सोहळा घेऊन पंढरपूरसाठी निघाले आहेत. 15 दिव्यांग वारकरी 35 दिवसांत 400 किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूरला दाखल होणार आहेत.

विठ्ठलाचे नामस्मरण करत हरिनामाच्या जयघोषात दिव्यांग वारकरी पायी पंढरपूरकडे निघाले आहेत. आम्ही पहिल्यांदाच विठ्ठलाच्या भेटीसाठी जात आहोत. पहिल्यांदाच आम्ही पायी वारी करत आहोत, असे या वारकऱ्यांनी म्हटले.