पुणे-कोल्हापूर महामार्गावर टोलमध्ये 25 टक्के सवलत


राज्यावरील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून महायुती सरकार बॅकफूटवर आले आहे. नाशिकमध्ये टोल न आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुणे ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्त होईपर्यंत या मार्गावर टोलमध्ये 25 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

नाशिक रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती होईपर्यंत या मार्गावर टोल आकारण्याचा निर्णय महायुती सरकारने जाहीर केला आहे. यानंतर काँग्रेसने आज जोरदार आंदोलन केले.

कोल्हापूर ते पुणे महामार्गावर प्रचंड खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत टोल माफी करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.