अचानक समोर आल्या पुतिन यांच्या मुली, राजकीय वारसदार असल्याची सोशल मीडियावर चर्चा

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या मुलींशी संबंधित माहिती सार्वजनिकरीत्या जाहीर केली नव्हती. पुतीन यांनीही कधी मुलींविषयी किंवा वारसाविषयी चर्चा केली नव्हती. मात्र नुकतेच एका कार्यक्रमात पुतीनसह त्यांच्या मुली हजर होत्या. पुतीन यांच्या मुलींची नावे कॅटरिना तिखोनोवा आणि मारिया वोरोत्नसोवे अशी आहेत. कॅटरिना टेक एक्झिक्युटीव्ह असून रशियाच्या संरक्षण इंडस्ट्रीमध्ये सहभागी आहे. तर मारिया सरकारी फंडिंग क्षेत्रात काम करीत आहे. असा दावा करण्यात येत आहे की, सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिक्स फोरममध्ये दोघी उपस्थित होत्या. मागील बऱयाच काळापासून आजारी असणाऱया पुतीन यांच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांच्या मुलींकडे पाहिले जात आहे.