दिशा पाटणीने एकता कपूरची उडवली खिल्ली

2503

आपल्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटणी हीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यात दिशा चक्क निर्माती एकता कपूर हीच्या गेटअपमध्ये दिसत आहे. दिशाने एकता साऱख्या सर्व बोटात अंगठ्या घातल्या आहेत. एवढचं नाही तर दिशाने एकतासाऱखे हातही जोडलेले या फोटोत दिसत आहे. दिशाच्या या मजेशीर फोटोवर चाहतेही कमेंटस करत आहेत.

फोटोखाली तिने एकता कपूरची चेष्टा करताना केटीना का ‘सबको जय माता दी'( आधी तिचे नाव टीना होते. पण आता केटीना झाले आहे. कारण ते तिला सूट होत आहे) अस तिला ज्योतिषाने सांगितले आहे. पण मित्रांनो इतक्या अंगठ्या कोणी घालत का असंही दिशाने यात म्हटले आहे. गंमत म्हणजे एकता कपूरने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावर टीव्ही अभिनेता करन वाही याने एकता कपूरवर चरित्रपट येणार आहे ? का असा सवाल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या