मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत नगरविकास खात्याच्या फाईलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खटके उडाले. फाईलवर सही करण्यापूर्वी ती वाचूनच त्यावर सह्या करेन, अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही मी तुमच्या फाईलवरही मी नाही का सह्या करत, असे सांगत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांच्याही ताठर भूमिकेमुळे बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला.
तानाजी सावंत अजित पवारांवर भडकले
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे खटके उडाले असतानाच तिथे उपस्थित असलेले तानाजी सावंत अजित पवारांवर भडकले. माझ्या विभागाच्या फाईलवरती तुम्ही निर्णय का घेत नाही, असा जाब त्यांनी विचारला.