ऍड. उज्ज्कल निकम यांनी सत्ताधारी पक्षाकडून लोकसभेची निकडणूक लढविल्यामुळे ते सरकारी वकील म्हणून राहण्यास अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना खटल्याचे कामकाज चालविण्यास बंदी घालावी, असा अर्ज धोम वाई खून खटल्याचा मुख्य आरोपी संतोष पोळ याने घेतलेला हरकत अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
धोम वाई खून खटल्याची सुनावणी वाई येथील विभागीय जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश न्या. निकम यांच्यासमोर सुरू आहे. त्यासाठी पोळ याला न्यायालयात आणले होते. सुनावणीसाठी सरकारी वकील ऍड. उज्ज्कल निकम, सहायक मिलिंद ओक उपस्थित होते.
संतोष पोळ याच्या हरकतीकर न्यायालयात दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. यानंतर संतोष पोळ याचा हरकत अर्ज फेटाळून लावला. या खटल्यातील साक्षीदार डॉ. विद्याधर घोटवडेकर आणि त्यांची पत्नी हे भाजप आणि संघाचे कार्यकर्ते आहेत आणि उज्ज्वल निकम यांनी भाजपकडून निवडणूक लढविली आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम हे घोटवडेकर यांच्या बाजूने साक्ष घेतील व त्यांना निर्देष सोडतील. खटल्याच्या अनुषंगाने ते साक्ष घेणार नाहीत, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निवडणुकीचा या खटल्यावर मोठा परिणाम होईल, असेही त्याने न्यायालयात सांगितले. त्यामुळे उज्ज्वल निकम यांना हा खटला लढविण्यास अपात्र ठरवाके, असेही पोळच्या वतीने न्यायालयास सांगितले. मात्र, न्यायालयाने त्याचे सर्व आरोप फेटाळून लावले.