प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांगांचा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

436

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रहार अपंग क्रांती संस्था आणि रत्नागिरी जिल्हा अपंग समन्वय समिती यांच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील हजारो दिव्यांगांची अद्याप ऑनलाईन नोंदणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाहीत, त्यामुळे दिव्यांगांसाठीचे ऑनलाईन प्रमाणपत्र काढण्यासाठी पुर्वीप्रमाणे रत्नागिरी व कामथे या दोन केंद्रावर नोंदणी व्हावी, अत्योंदय योजना व संजय गांधी निराधार योजना राबविताना वार्षिक उत्पन्नाची अट वाढवावी व योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, दिव्यांगासाठी राखीव 5 % निधीचा प्रभावीपणे वापर व्हावा, खाजगी आस्थापनांवर दिव्यांगांना रोजगार मिळावा, स्वयंरोजगारासाठी नगरपंचायत व नगर परिषद तसेच ग्रामपंचायत हद्दीमध्ये जागा मिळावी, शासकीय सर्व समित्यावर अपंग प्रतिनिधी नेमताना जिल्हा समन्वय समितीशी चर्चा होऊन प्रतिनिधी नेमावा, जिल्हा रुग्णालय परिसरात दिव्यांगांचा संपर्क व समस्या सोडविण्यासाठी तसेच विश्रांतीसाठी छोटे कार्यालय उपलब्ध व्हावे, 5% राखीव निधी वाटप कमिटीमध्ये फक्त दिव्यांग व्यक्तीलाच सदस्य पदी नेमावे, जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे समवेत संघटनेची त्रैमासिक सभा व्हावी, या मागण्या दिव्यांगांच्या आहेत. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या