
तुम्हाला आता घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता तुमच्यातील अहंकार बाजूला ठेवा आणि अल्पवयीन मुलीच्या भविष्याचा विचार करा, त्याचा नीट सांभाळ करा, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने एका जोडप्याला कानपिचक्या दिल्या.
तुम्ही दोघांनी सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही त्यासाठी मंजुरी देतोय, अन्यथा तुमच्या मुलीचा विचार करता आम्ही कधीच घटस्फोटला मंजुरी दिली नसती, असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले. न्यायमूर्ती बी वी नागरत्ना आणि आर महादेवन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. आता तुमचे लग्नच टिकले नाही, त्यामुळे आता तुमच्यात पुठलाही अहंकार असता कामा नये. आता मुलीचा नीट सांभाळ करा, असे न्यायालय म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या घटस्फोटाला मंजुरी न देण्याच्या अंतरिम आदेशाला संबंधित महिलेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.