दिवाळी अंक – आगरी दर्पण

रौप्य महोत्सवी वर्षात पदापर्ण करणाऱया ‘आगरी दर्पण’ हा अंक तितकाच माहितीपूर्ण झाला आहे. कथा, कविता, मुलाखत, परिसंवाद असा विविधांगी साहित्याने नटलेला हा अंक आहे. उतराई, एकमात्र, ती गेली, मोलकरीण, भरोसा करके तो देखो अशा कथांबरोबरच बाबांची कोरोना वारी, मराठय़ांची तलवार विरुद्ध ओबिसींची ढाल, मराठा आरक्षणाचे करायचे काय हे लेख आहेत. परिसंवाद विभागात कोरोनोत्तर जगणं कसं असेल, देणाऱयांचे हात हजार, बिघडत्या मनारोग्याचं आव्हान, कोरोनोत्तर जगण्याला आयाम देताना, आयुष्याची कमिटमेंट देताना हे लेख आहेत. याबरोबरच ठाणे जिह्यातील आगरी समाजाची स्थिती, रामशेठ ठापूर यांची विशेष मुलाखत, भय इथले संपत नाही, अखेरचा डाव हे साहित्यही दर्जेदार झाले आहे.

संपादक – दीपक म्हात्रे, मूल्य – 200 रुपये.

विवेक

वैचारिक पातळीवरील साहित्य घेऊन यंदाचा ‘विवेक’ हा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला आहे. हिंदुस्थानसह अन्य तीन देश आणि तीन दिशा हा संविधान विषयावर रमेश पतंगे आणि बहुजनवादी हिंदुत्वाचे अभिजन व्यवस्थेला आव्हान हा दिलीप करंबेळकर यांच्या लेखाने ‘विवेक’ची सुरुवात होत आहे. अयोध्येतील राममंदिर, सोमपुरा घराण्याची सुवर्णपताका, तिसऱया पर्यायाकडे ज्ञानाचा तिसरा डोळा, राममंदिर ते राष्ट्र मंदिर हे लेखही लक्षवेधी आहेत. संस्था परिचय विभागात नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्राची माहिती घेता येईल. ललित साहित्यात ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांची वयाच्या मानाने हा विशेष लेख आहे. व्यक्तिचरित्रात नरसिंहाय नमो नम:, सेवाव्रती रवींद्र संघवी, विज्ञानेश्वर लोकमान्य, वैचारिक ध्येयवाद जगणाऱयांचे अध्वर्यू, परिसंवाद विभागात जग बदलणारा विषाणू, कोविड आणि औपचारिक शिक्षणाची दिशा, डेटाइझम, ऑनलाइन तिसरी घंटा, मराठी चित्रपटसृष्टी न्यू नॉर्मल आव्हानात्मक, मनोरंजन विश्वाचा स्थित्यंततराचा काळ, बॅग भरो निकल पडो हे लेख उल्लेखनीय आहेत.

संपादक – दिलीप करंबेळकर. मूल्य – 200 रुपये.

मराठी संशोधन पत्रिका

मराठी संशोधन पत्रिकेचा यंदाचा अंक टिळक आगरकरांचा कालखंड म्हणून प्रकाशित झाला आहे. या वर्षी लोकमान्य टिळक यांचे 100 वे तर गोपाळ गणेश आगरकर यांचे 125 वे पुण्यस्मरण आहे. या अंकाचे मुखपृष्ठ चित्रगुरू पृष्णराव केतकर यांनी काढलेले वापरण्यात आले आहे. अंकात 19 व्या आणि 20 व्या कालखंडातील काही दुर्मिळ, असंग्रहीत आणि अप्रकाशित लेखांचा या अंकात समावेश आहे. यामध्ये गोपाळराव जोशी यांच्या प्रवासाची हकिकत, परशुरामपंत थत्ते यांचे लिखित चरित्र, भावेबंधूंची भव यात्रा, ज्ञानोदयमधील विचार, फुले यांचा विचारविश्व, गीतारहस्य, मानववादी आगरकर, 19 व्या शतकातील निबंध वाङ्मय वाचायला मिळतील. याबरोबरच आपत्ती हिच इष्टपती… ही टॅगलाइन समोर ठेवून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संकटांशी सामना करताना आपत्ती आपल्याला किती बळ देऊन जाते हा विचारही या अंकात देण्यात आला आहे.

संपादक – डॉ. प्रदीप कर्णिक, मूल्य – 150 रुपये.

दीपावली

कथा, दीर्घकथा, ललितलेख, लेखमाला, कवितादारलन अशा विविधांगी साहित्याने सजलेला दीपावलीचा यंदाचा दिवाळी अंक आहे. अंकाची सुरुवात भारत सासणे लिखित इश्काचा जहरी प्याला या दीर्घकथेने झाली आहे. याशिवाय लेखक मिलिंद बोकील यांची भूमका, विवेक गोविलकर यांची षट्सर्पाकृती, प्रज्ञा पवार यांच्या लघुकथा, गणेश मतकरी यांची फ्रेश स्टार्ट या कथा वाचनीय झाल्या आहेत. याबरोबरच बी फॉर ब्लू, सांगोवांगीच्या कथा, हेर्टा म्युलर, ज्ञानदेवांचे मार्दव, चौथा वाघ, जिक्र ए मिर, वेडेपणाचा अनुभव, चिनी ड्रगनचे करायचे तरी काय, वाचनाचा तास हे ललित लेख आहेत. ये सोशल दूरियाँ, आरोग्य क्षेत्रातील सोशल डिस्टन्सिंग, शिकणं आणि शिक्षण, गोष्ट नात्यांची, राष्ट्रीय राजकारणातील सोशल डिस्टन्सिंग, मूल्य दृष्टय़ाचा आईना या लेखमाला आहेत. कविता दालनात दासू वैद्य, महेश केळुस्कर, वसंत डहाके, प्रियदर्शन पोतदार, प्रवीण दवणे, अनुराधा नेरूरकर, श्रीकांत संजय राऊत, गणेश भाकरे यांच्या कविता वाचनानंद देणाऱया आहेत.

संपादक – अशोक कोठावळे, मूल्य – 250 रुपये.

ग्राहक तितुका मेळवावा

मुंबई ग्राहक पंचायतीचा ‘ग्राहक तितुका मेळवावा’ हा अंक वैविध्यपूर्ण आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जाहिरात विश्वाला मिळालेला दणका, बरोबरच अपडेटेड बालग्राहक, सणासुदीला घर करा प्रसन्न, आगळीवेगळी रांगोळी,अन्न सत्य, कृत्रिक मधुरकांची गोडी, मायक्रोग्रीन्स रुजवा आणि खा, विमान प्रवाशांना परतावा देण्याचे आदेश, वाचू आनंदे, ई काॅमर्स- ग्राहकांसाठी नवी व्यवस्था, कथा विश्वातून छोटी सी बात, आहाविषयक मार्गदर्शन, आरोग्य संजीवनी असा जीवनमूल्य सांगणारा यंदाचा अंक आहे.

संपादक – शुभदा चौकर

आपली प्रतिक्रिया द्या