
तब्बल 143 देशांत 8 हजारांहून अधिक सेवाकेंद्रांच्या माध्यमातून निःशुल्क ध्यानधारणा शिकवणाऱया प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यारणा प्रशिक्षक डॉ. दीपक हरके यांचा देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनर्स अॅण्ड रेकॉर्ड, इंग्लंडच्या वतीने ऑनर सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला. हिंदुस्थानच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे कार्य त्यांनी केले, त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनर्स अॅण्ड रेकॉर्ड, इंग्लंडचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. दिवाकर हेदेखील उपस्थित होते.