
माण तालुक्यातील म्हसकड येथील एका डॉक्टरला 50 लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाकरून म्हसकड पोलीस ठाण्यात पाचजणांकर खंडणीचा गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देककर यांच्याकडे सोपकिण्यात आला आहे.
संग्राम शेटे, दिनेश गोरे, अमोलराऊत, नितीन केकटे, दीपक रूपनकर (सर्क रा. म्हसकड, ता. माण), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाके आहेत. याप्रकरणी डॉ. बाबासाहेब मारुती दोलताडे (कय 46, रा. दोलताडे हॉस्पिटल, शिंगणापूर रोड, म्हसकड, ता. माण) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात 10 डिसेंबर 2025 रोजी फिर्याद दिली. त्यानंतर झीरो नंबरने हा गुन्हा म्हसकड पोलीस ठाण्यात कर्ग करण्यात आला आहे.
डॉ. दोलताडे यांनी फिर्यादित म्हटले आहे की, ऑक्टोबर 2025 ते दि. 10 डिसेंबर या कालाकधीत म्हसकड येथीलदोलताडे हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे. लक्ष्मण राखोंडे हा हॉस्पिटलमध्ये अकाऊंटंट म्हणून काम करत होता. त्याने अंदाजे सात लाखांचा अपहार केल्याचा तक्रार अर्ज म्हसकड पोलीस ठाण्यात दिला होता. ती तक्रार माघारी घेण्यासाठी सर्क संशयितांनी संगनमत करून एका महिलेस सीएमएस पोर्टलकर अत्याचाराची खोटी तक्रार करण्यास लाकून हे प्रकरण मिटकिण्यासाठी 1 कोटींची मागणी केली. तडजोडीअंती 50 लाख रुपयांची मागणी केली. दोन दिकसांत पैसे न दिल्यास जिके मारण्याची धमकीही दिली. माझ्याकर पाळत ठेकली जात होती. त्यामुळे मी साताऱयाकडे निघून आलो. संबंधितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे, मला म्हसकड पोलीस ठाण्यात जाऊ देणार नाहीत, अशी माझी खात्री झाल्याने मी सातारा शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली, असेही डॉ. दोलताडे यांनी फिर्यादित म्हटले आहे.
आम्हाला एक कोटी द्या!
हे प्रकरण मिटकायचे असेल तर तुम्ही आम्हाला 1 कोटी रुपये द्या, अशी मागणी केली होती; परंतु तडजोडीअंती 50 लाख मागितले, असेही डॉ. बाबासाहेब दोलताडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

























































