डॉक्टरांची मनमानी, लुटमारीला चाप; महागडी औषधे विकता येणार नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैद्यकीय उपचाराच्या माध्यमातून रुग्णांची होणारी लूट व डॉक्टरांच्या मनमानीला लगाम बसणार आहे. यापुढे डॉक्टर रुग्णांना महागडी ब्रॅण्डेड औषधे तसेच वैद्यकीय उपकरणे विकू शकणार नाहीत. मनमानी कागणाऱया डॉक्टरांवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यासंदर्भात थेट आचारसंहिताच जारी केली आहे. त्यामुळे देशभरातील डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.

वैद्यकीय आयोगाच्या आचारसंहितेमध्ये डॉक्टरांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार डॉक्टर स्वत: ज्या आजारावर उपचार करीत आहेत, त्याच आजारावर त्यांच्या रुग्णाला औषध विकू शकतील. रुग्णांचे कुठल्याही प्रकारचे शोषण होणार नाही याची काळजी डॉक्टरांना घ्यावी लागणार आहे. आयोगाच्या तरतुदीचा छोटय़ा शहरांतील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. छोटय़ा शहरांमध्ये दवाखाने चालवणारे डॉक्टर स्वतःची दुकाने उघडून रुग्णांना महागडी औषधे विकतात. अशा ब्रँडेड औषधांच्या नावाखाली रुग्णांकडून अवाचेसवा पैसे उकळले जातात. ही लुटमार आता थांबणार आहे.

आयोगाच्या आचारसंहितेतील तरतुदी

– धर्माच्या आधाराकर कोणत्याही रुग्णाला उपचार नाकारता येणार नाही.
– नसबंदीच्या बाबतीत पती-पत्नी दोघांची परवानगी घेणे बंधनकारक असेल.
– डॉक्टरांनी सुरुवातीलाच प्रिक्रिप्शनवरील नोंदणी क्रमांक तसेच शुल्क सांगावे.
– डॉक्टरांना औषधांचे दुकान चालवता येणार नाही.
– पहिल्या वर्षापासून अंतिम वर्षापर्यंतच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना ते डॉक्टर नसून विद्यार्थी असल्याचे सांगावे लागणार.