पाकव्याप्त कश्मीर, लडाखमधील डॉक्टरांना हिंदुस्थानात प्रॅक्टिस करण्यास बंदी

पाकक्याप्त कश्मीर आणि लडाखमधील वैद्यकीय पदवी असणाऱया व्यक्तींना हिंदुस्थानात प्रॅक्टिस करता येणार नाही. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीए) तसा निर्णय घेतला आहे.

जम्मू-कश्मीर आणि लडाख हे हिंदुस्तानचे अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे जम्मू-कश्मीर आणि लडाखमधील वैद्यकीय शिक्षण संस्थाना एमसीआय कायदा, 1956 अन्वये परवानगी घेणे बंधनकारक आहे. पाकिस्तानने या दोन्ही प्रदेशांमधील काही भागांवर अतिक्रमण करून तो बळकाकला आहे. त्यामुळे हिंदुस्थानी प्रदेशातील प्रत्येक वैद्यकीय संस्थेला हिंदुस्थानी कायद्यानुसार मान्यता घेणे बंधनकारक आहे. हिंदुस्थानात डॉक्टरकी करायची असल्यास वैद्यकीय पदवी ही एमसीआय मान्यता असलेलीच लागते. पाकव्याप्त भागांतील पदव्या असलेल्या डॉक्टरांची हिंदुस्थानात डॉक्टर म्हणून नोंदणी करता येणार नाही असे एमसीआयने एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे. पाकव्याप्त भागातील वैद्यकीय संस्थांमधील पदव्या अनधिकृत समजल्या जातील आणि तेथील पदवीधरांना हिंदुस्थानात वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी ट्विटरवर नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या