टॉमीला ‘कुत्रा’ म्हटले; मालक चवताळला, शेजाऱ्यांना काठीने बदडले

पाळीव प्राण्यांवर त्यांच्या मालकांचे प्रेम असते. तसेच प्राणीही मालकांना लळा लावतात. आपल्या या प्राणीप्रेमामुळे कोणाला त्रास तर होत नाही ना, याची काळजी घेणे तसेच इतरांच्या समस्या समजून घेणेही गरजेचे असते. मात्र, काहीजणांना आपले पाळीव प्राणीच प्रिय असतात. त्यांना इतरांची काळजी नसतेच. अशीच एक घटना हरियाणातील गुरुग्राम येथे घडली आहे.

हरियाणातील गुरुग्राम येथील सायबरसिटी परिसरातील ज्योती पार्क येथे ही घटना घडली आहे. शेजाऱ्यांकडे असलेल्या पाळीव कुत्र्याच्या त्रासाने परिसरातील नागरहिक त्रस्त होते. हा कुत्रा नेहमी भुंकत असे. तसेच लहान मुलांच्या मागेल गात असे. काहीजणांना तो चावलाही होता. त्यामुळे सुधीर यांनी कुत्र्याच्या मालकाला कुत्र्याला बांधून ठेवण्याचा सल्ला दिला. मात्र सुधीर यांनी टॉमीला बांधून ठेवा, असे न सांगता तुमच्या कुत्र्याला बांधून ठेवा, असे सांगितले. त्यावेळी मालकाच्नेया तळपायाची आग मस्तकात गेली.

सुधीर काय म्हणत आहे, ते काय सांगायला आले आहेत, याचा विचार न करता, माझ्या टॉमीला तुम्ही कुत्रा कसे म्हणाला, असा जाब विचारत कुत्र्याच्या मालकाने सुधार यांना मारहाण सुरुवात केली. घटनेला दोन दिवस उलटल्यानंतरही सुधीर आपल्या टॉमीला कुत्रा म्हणाला, याचा राग मालकाच्या मनात होता.

मालक पुन्हा जाब विचारायला गेला. तेव्हा दोन्ही कुटुंबांमध्ये वादावादी झाली. पुन्हा टॉमीला कुत्रा म्हणण्यात आले. यामुळे मालक एवढे चवताळले की त्यांनी सुधीर आणि त्यांच्या कुटुंबियांना काठीने  बदडण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात सुधीर यांच्या कुटुंबातील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी सुधीर यांनी गुरुग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी तक्रारीची दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या