चक्क कुत्र्याला मिळाली मेडिकल सेंटरमध्ये नोकरी

जगाच्या पाठीवर कुठे काय घडेल याचा काही नेम नाही. सोशल मिडियावर सध्या एका पुत्र्याचे पह्टो व्हायरल होतायत. यात त्या कुत्र्याच्या गळ्यात एका मेडिकल सेंटरचे ओळखपत्र पाहायला मिळतेय. ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीच्या मेडिकल सेंटरने चक्क शिलोह नावाच्या एका कुत्र्याला नोकरीवर ठेवले आहे. येथे येणाऱया जाणाऱयांचे स्वागत करण्याची जबाबदारी त्याच्यावर असणार आहे.

कोरोनाच्या या महामारीत रुग्णांचा आणि मेडिकल सेंटरमधील कर्मचाऱयांचा विरंगुळा व्हावा, त्यांचा ताण हलका व्हावा यासाठी हे पाऊल उचलले आहे.’ आमच्या रुग्णालयाने एका क्यूट एम्प्लॉयला कामावर ठेवले आहे,’ असे म्हणत डॉ. शारी डूनावे यांनी या शिलोहचे फोटो शेयर केले होते. बघता बघता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आतापर्यंत 60 हजारांहून अधिक लाईक्स या पह्टोला मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी ब्राझीलमध्ये एका ह्युंडाई कार शोरूममध्येदेखील एका कुत्र्याला चक्क सेल्समनची नोकरी देण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या