याला म्हणतात संस्कार! प्रार्थना झाल्यानंतरच श्वानांनी केले जेवण

आजही अनेक घरांमध्ये जेवणापूर्वी ‘वदनी कवळ घेता…’ ही प्रार्थना म्हटली जाते. लहान मुलांना ही प्रार्थना हमखास शिकवली जाते. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात या महिलेने चक्क आपल्या दोन श्वानांना ही प्रार्थना शिकवली आहे. महत्त्वाचे म्हणजे जोपर्यंत प्रार्थना पूर्ण होत नाही तोपर्यंत हे श्वान जेवणालाही स्पर्श करत नाहीत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या महिलेचे आणि श्वानांचे कौतुक होत आहे.

वैशाली माथूर यांनी आपल्या एका मैत्रिणीचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात ती महिला जेवणापूर्वी ‘वदनी कवळ घेता…’ ही प्रार्थना म्हणताना दिसतेय. तिच्या बाजूला दोन पाळीव श्वान बसले आहेत. या महिलेची प्रार्थना पूर्ण होईपर्यंत दोघेही संयमाने एका जागी बसले आहेत. प्रार्थना संपल्यानंतरच त्यांनी त्यांचे पेटफूड खायला सुरुवात केली. हा व्हिडिओ नेटकऱयांना आवडला असून आतापर्यंत त्याला 43 हजारांहून अधिक ह्यूज मिळाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या