
मध्य रेल्वेच्या दिवा ते कल्याण स्थानकांदरम्यान जुना पादचारी पूल हटविण्यासाठी उद्या शुक्रवार आणि परवा शनिवारी मध्यरात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. दिवा ते कल्याणदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री 1.10 ते पहाटे 3.40 आणि डोबिवली ते कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गावर मध्यरात्री 1.10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत काम करण्यात येणार आहे. शनिवारी मध्यरात्री 1.00 ते मध्यरात्री 3.30 वाजेपर्यंत दिवा-कल्याणदरम्यान अप धिम्या मार्गावर तर डाऊन धिम्या मार्गावर रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे.



























































