डोंबिवलीत स्टंटबाजी करणाऱ्या रोडरोमियोंना पोलिसांचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माणकोली, मोठागाव, ठाकुर्ली येथील उड्डाणपुलावर भरधाव वेगाने रेस लावून स्टंटबाजी करणाऱ्या रोडरोमियोंना विष्णूनगर स्टंटबाजीमुळे अनेक अपघातांना आमंत्रण मिळत होते. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंची खातरजमा करून पाच जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.

पीयूष म्हात्रे (२१), वेदांत सावंत (१८), प्रदीप ढाकणे (२१) या तीन वाहनचालकांसह रेसिंगचे व्हिडीओ चित्रित करणारे विशाल विश्वकर्मा (२१) आणि कृष्णा विश्वकर्मा (१९) दंडात्मक कारवाई यांच्याविरोधात कारवाई करण्यात . सोशल मीडियावरून ओळख वाढवत या तरुणांनी आधी इन्स्टाग्रामवर मैत्री केली. त्यानंतर व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून उड्डाणपुलावर धोकादायक पद्धतीने वाहन चालवण्याचे प्रकार सुरू केले होते. रात्री उशिरा या पुलावर वेगवान रेसिंग होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पोलिसांना मिळत होत्या. या पाश्र्वभूमीवर विष्णूनगर पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे शोध घेत स्टंटबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले.