माहेरहून पैसे आणण्यासाठी दिले इस्त्रीचे चटके, महिलेचा गंभीर आरोप

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेवर दबाव टाकत तिला इस्त्रीचे चटके देत छळ केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे सुंदरवाडी येथे घडली. विवाहित महिलेने पती, सासरे आणि नणंद यांच्या विरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

विवाहित महिलेने तिला सासरी होणाऱ्या छळामुळे पोलीस ठाणे गाठले. त्या महिलेने २०१७ पासून आपला सासरी छळ सुरू असल्याची तक्रार नोंदवली आहे. महिलेचा पती योगेश शिर्के, सासरे परशुराम शिर्के आणि नणंद माधवी शिर्के यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहेरहून पैसे आणण्यासाठी मारझोड करून चिमटे काढण्यात आले तसेच इस्त्रीचे चटके दिल्याचे त्या महिलेने तक्ररारीत म्हटले आहे.