अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीच्या सर्वेक्षणांमधील कल हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकेन नागरिक कमला हॅरिस यांच्या बाजूनेच दिसत आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा तिळपापड झाला असून कमला हॅरिस जिथून आल्या आहेत तिकडेच त्यांना फेकून द्या, अशा शब्दांत ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर टीकू शकणार नाहीत असेच सर्वजण म्हणत होते. पण आता चित्र नेमके उलटे आहे. कमला हॅरिस यांना ट्रम्प यांच्यापेक्षा चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांचा विजय निश्चित असल्याचे सर्वेक्षण सांगत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हॅरिस दाखल झाल्यापासून मतांची टक्केवारी वाढणार असल्याचे समोर आले. ट्रम्प यांचा विजय लोकशाहीसाठी घातक ठरेल असा दावा हॅरिस यांनी केला.