युरेनियमचा जास्त साठा केल्यास परिणाम भोगावे लागतील, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात युरेनियमचा साठा करण्याच्या इराणच्या भूमिकेमुळे जागतिक स्तरावर वाद विकोपाला गेलेला असतानाच अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज इराणला सज्जड दम भरला आहे. वाजवीपेक्षा जास्त युरेनियम बाळगल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला असून मर्यादेबाहेर युरेनियमचा साठा करून इराण आगीशी खेळत आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

तीनशे किलो युरेनियमचा साठा करण्याची मर्यादा इराणने केव्हाच ओलांडली आहे, असा दावा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने काल केला होता. त्याच्या प्रत्युत्तरादाखल आम्ही युरेनियमचा साठा आणखी वाढवू, असे इराणने जाहीर केले होते. याच दरम्यान ब्रिटननेदेखील इराणला युरेनियमचा जास्त साठा करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. युरेनियमचा साठा करण्यासंदर्भात इराणने करारही केला आहे. त्या कराराशी इराणने प्रामाणिक राहावे, असेही ब्रिटनने म्हटले आहे.