अफवांवर विश्वास ठेवू नका -पालकमंत्री ॲड. अनिल परब

चिपळूणातील पुराचा जोर ओसरत असून त्याचा बचावकार्याला वेग आला आहे.एनडीआरएफ,तटरक्षक दल,स्थानिक असे 200 जवान मदतकार्यात सहभागी झाले आहेत. “मी स्वत चिपळूणात थांबून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका.वेळोवेळी हि माहिती आम्ही नागरिकांना देऊ.” असे पालकमंत्री ॲड अनिल परब यांनी सांगितले आहे.
आतापर्यंत साडेबाराशेहून अधिक जणांना पुरात बाहेर काढण्यात आले असून पुराचे पाणी ओसरत असल्याने लवकरच सर्वांची सुटका करणे शक्य होईल. पूरग्रस्तांच्या निवारा आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका. खेड तालुक्यात पोसरे येथे दरड कोसळून 17 जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक प्रशासन मदत कार्य करत असून एनडीआरएफचे पथक आम्ही पोसरेला पाठवले आहे असेही परब यांनी सांगितले.
आपली प्रतिक्रिया द्या