मला माजी मंत्री म्हणू नका!

सत्तेत पुन्हा येण्याची भाजप नेत्यांची आशा अद्यापही कायम आहे. याबाबत भाजप नेत्यांकडून कायम काही ना काही वक्तव्य केली जात असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एक नवे विधान केले. ‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल,’ असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी पुन्हा नवी भविष्यवाणी वर्तवली आहे. पिंपरी-चिंचवड जवळील देहूगावमधील एका खाजगी कार्यक्रमात मंचावरून सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी माजी मंत्री म्हणू नका, असे विधान केले.

आपली प्रतिक्रिया द्या