चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या ऑनलाइन पोर्टलवर विश्वास ठेवू नका; सीबीएसई बोर्डाची विद्यार्थ्यांना सूचना

सीबीएसई बोर्डाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी सूचना जारी केल्या आहेत. खोटय़ा आणि चुकीच्या बातम्या पसरवणाऱया ऑनलाइन पोर्टलवर विश्वास ठेवू नका, अशी सूचना बोर्डाने केली आहे. काही वेबपोर्टल परीक्षेसंबंधी कालबाह्य झालेल्या लिंक्स, नमुना प्रश्नपत्रिका, अभ्यासक्रम, सीबीएसई बोर्डाविषयी चुकीची माहिती पसरवत आहेत. या बातम्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील परीक्षांसंबंधी निगडीत असल्याचा दावा पोर्टलवर करण्यात आला आहे. मात्र यात तथ्य नसल्याचे सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थी-पालकांनी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीच्या आधारे परीक्षांना सामोरे जावे. खासगी पोर्टलवर प्रसिद्ध होणारी माहिती दिशाभूल करणारी किंवा चुकीची असू शकते. त्यामुळे शाळा, विद्यार्थी, पालक यांना अनावश्यक गोंधळाला सामोरे जावे लागले, असे सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे. सीबीएसई बोर्डाने सोमवारी जारी केलेल्या परिपत्रकात काही वेबसाईट्सच्या लिंक्स दिल्या आहेत. विद्यार्थी, पालकांनी या लिंक्सआधारे हवी असलेली माहिती घ्यावी, असे आवाहन सीबीएसई बोर्डाच्या सचिवांनी केले आहे.

सीबीएसईने जारी केलेल्या काही लिंक्स

सीबीएसई मुख्य वेबसाईट http://www.cbse.gov.in/

नमुना प्रश्नपत्रिका, विषय, अभ्यासक्रम, प्रकाशक याविषयी – https://www.cbseacademic.nic.in/

परीक्षा निकाल https://results.cbse.nic.in/

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा https://ctet.nic.in/

प्रशिक्षण त्रिवेणी https://cbseit.in/cbse/2022/ET/frmListing

इंटिग्रेटेड ई-एफिलेशन सिस्टम – https://saras.cbse.gov.in/SARAS

n परीक्षाविषयक https://parikshasangam.cbse.gov.in/ps/