
मतचोरीचे आरोप शपथपत्रावर करा, असे राहुल गांधी यांना सांगणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाला माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज सुनावले. तक्रारींची वाट बघत बसू नका, मतचोरीच्या आरोपांची चौकशी करा, असे रावत म्हणाले.
मतदार याद्यांतील घोटाळ्याचे पुरावे राहुल गांधी यांनी नुकतेच दिले. त्यामुळे बिथरलेल्या आयोगाने त्यांना शपथपत्रावर आरोप करण्यास सांगितले. त्यावरून ओ. पी. रावत यांनी निवडणूक आयोगाला सल्ला दिला आहे. ‘एखाद्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने काही आरोप केल्यास निवडणूक आयोग स्वतःहून चौकशी करतो आणि लोकांसमोर सत्य मांडतो, जेणेकरून या संस्थेवर लोकांचा विश्वास कायम राहील. मी निवडणूक आयुक्त असतानाही हेच होत होते. आम्ही कधीही राजकीय पक्षांना आधी तुम्ही तक्रार करा असे सांगितले नाही’, असा टोला रावत यांनी हाणला.