डोनाल्ड ट्रम्प यांना गुगलचाही दणका, यू-ट्यूब अकाऊंटवर आठवडाभर बंदी

सत्तेसाठी समर्थकांची माथी भडकावणारे अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल मीडियातही थारा मिळेनासा झाला आहे. फेसबुक, ट्विटरपाठोपाठ गुगलने त्यांच्या यू-ट्यूब अकाऊंटवर आठवडाभरासाठी बंदी घालून दणका दिला आहे. ट्रम्प यांचे यू-ट्यूब व्हिडीओ हिंसेला निमंत्रण देत असल्याचे गुगलने म्हटले आहे.

अमेरिकन संसदेवरील हल्ल्याला डोनाल्ड ट्रम्पच जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. यावरून डेमोव्रेटिक पार्टीने त्यांची कोंडी केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा पुठल्याही वादग्रस्त व्हिडीओवरून हिंसाचार उफाळला जाऊ नये म्हणून गुगलने खबरदारी घेतली आहे. हिंसाचारानंतर ट्रम्प यांनी यू-ट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले नवीन व्हिडीओ काढून टाकण्यात आले आहेत.

अनेक कंपन्यांनी टाकला बहिष्कार

सोशल मीडियाबरोबरच उद्योग जगतानेही ट्रम्प यांना धक्के दिले आहेत. स्ट्राईप, शॉपिफाय या ई-कॉमर्स कंपन्यांसह अमेरिकेतील आघाडीच्या अनेक कंपन्यांनी ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या सेवा नाकारल्या आहेत.

स्ट्राईप कंपनीने ट्रम्प यांच्याशी संबंधित व्यवहार थांबविले आहेत. तसेच शॉपिफाय व गोफंडमी या कंपन्यांनीही ट्रम्प यांच्यापासून फारकत घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या