दूरदर्शनच्या प्रसिद्ध निवेदिका नीलम शर्मा यांचं निधन

1817

 

दूरदर्शनच्या प्रसिद्ध निवेदिका नीलम शर्मा यांचे निधन झाले आहे. दूरदर्शनने आपल्या अधिकृत टि्वटर अकाऊंटवरुन नीलम यांच्या निधनाची माहिती दिली. नीलम यांच्या निधनावर दूरदर्शनने शोक व्यक्त केला आहे. नीलम शर्मा या कर्करोगाने ग्रस्त होत्या.

मागील २० वर्षांपासून त्या दूरदर्शनशी निगडीत होत्या.दूरदर्शनमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम केले.आपल्या कारकिर्दीत नीलम शर्मा यांनी ‘तेजस्विनी, बडी चर्चा’ सारख्या अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. नीलम यांना मार्चमध्येच ‘नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नीलम शर्मा यांनी १९९५ मध्ये दूरदर्शनमध्ये आपली कारकीर्द सुरु केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या