दापोलीत मिंधे गटाला लागलेली गळती काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. तामोंड गावाने जाहीर शिवसेना पक्ष प्रवेश केल्या नंतर म्हैसोंडे गावचे शाखाप्रमुख मनोज शिर्के यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर काही तासातच अडखळ शाखाप्रमुखांनी मिंधे गटाला रामराम ठोकत शिवसेनेची मशाल हाती घेतली. त्यामुळे मिंधे गट चांगलाच हतबल झाला आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदमांच्या नेर्तृत्वावर विश्वास व्यक्त करत मिंधे गटाचे अडखळ या गावचे शाखा प्रमुख सुरेश चौधरी यांनी माजी आम.संजय कदम यांच्या उपस्थितित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. सुरेश चौधरी यांच्या प्रवेशाने मिंधे गटाला चांगलाच हादरा बसला आहे.
दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम हे करत असलेल्या संघटनात्मक कामामुळे अवघा दापोली विधानसभा मतदार संघ हा भगवामय झाला आहे. विधानसभा निवडणुका कधीही होवोत दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा उमेदवारच बाजी मारणार हे सत्य काही आता लपून राहीलेले नाही. त्यामुळे आपल्या गावाचा, परिसराचा वा तालूक्याचा विकास करून घ्यायचा असेल तर शिवसेनेशिवाय कुठलाच पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे आपण संजय कदम यांचे नेर्तृत्व स्विकारत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश करत असल्याचे, प्रवेशकर्ते सुरेश चौधरी यांनी शिवसेना प्रवेशावेळी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी शिवसेनेचे दापोली तालूका सचिव नरेंद्र करमरकर, वर्षा शिर्के, युवासेना तालूका अधिकारी उमेश साटले, विभाग प्रमुख तृशांत भाटकर, उपविभाग प्रमुख दिपक गुरव आदींसह शिवसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी तसेच शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.