विंक अॅपवर गाण्यांचा डबल धमाका

संगीतप्रेमींना खास भेट मिळाली आहे. त्यांच्यासाठी आता गाण्यांचा डबल धमाका होणार आहे. एअरटेलचे विंक म्युझिक अॅप तुम्हाला ठाऊक असेलच. हे अॅप डाऊनलोड करून गाणी ऐकता येतात. विंक म्युझिकने आता डॉल्बी अॅटमॉससोबत एकत्र येऊन जास्तीत जास्त गाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे यशराज फिल्म, सारेगम, फोनोग्राफिक डिजिटल लिमिटेड अशा प्रतिष्ठत म्युझिक कंपन्यांची आठ भाषांमधील गाणी ऐकता येतील. ही सुविधा विनामूल्य मिळणार आहे.