शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी

  • डॉ. अभिजित पळशीकर

आपल्या देशात दरवर्षी पाच लाखांहून अधिक हृदयरुग्णांवर अँजिओप्लॅस्टी केली जाते. त्यापैकी 70 वर्षांवरील 90 टक्के पुरुष आणि 67 टक्के स्त्रियांच्या कोरोनरी आर्टरीमध्ये जे ब्लॉकेज आढळतात, ते कॅल्शियमचे असतात. आतापर्यंत या ब्लॉक्समध्ये स्टेंटिंग करणं खूप कठीण होतं आणि रुग्णावर फक्त बायपास शस्त्रक्रिया झाली होती, पण आता इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी किंवा शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी तंत्र आलं आहे. या तंत्राच्या मदतीने बायपास शस्त्रक्रियेचा सामना करण्याची क्षमता नसलेले रुग्ण सहजपणे अँजिओप्लॅस्टी करू शकतात.

काय आहे शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी

कॅल्सिफाईड ब्लॉकेजमध्ये अत्यंत प्रभावी असे हे तंत्रज्ञान आहे. आतापर्यंत कॅल्सिफाईड ब्लॉकेज असलेल्या आर्टरीमध्ये इंटरवेन्शनने स्टेंटिंग मिळवणे कठीण होते. कारण 30 ते 50 टक्के आर्टरी पुन्हा बंद होण्याचा किंवा आर्टरी फुटण्याचा धोका आहे. ऑप्टिकल कोहान टोमोग्राफीमधून (ओसीटी) त्याची तपासणी केली जाते. या तपासणीत आर्टरी सोनोग्राफीपेक्षा दहापट अधिक रेझ्युलेशन दिसून येते आणि शॉकवेव्ह लिथोट्रिप्सीपासून कॅल्शियम किती तुटले आहे, स्टेंट चांगला उघडा आहे की नाही याचे अनुमान लावता येते.

तंत्रज्ञान कसे काम करते

शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी हे एक सोनोग्राफिक तंत्र आहे. सोनोग्राफिक वेव्हमुळे कॅल्शियम तुटले जाते आणि स्टेंट घातला जातो. त्यामुळे आर्टरीचे कोणतेही नुकसान होत नाही आणि कॅल्शियमचे बारीक कण आर्टरीचा भाग बनतात. या तंत्रासह अँजिओप्लॅस्टीसाठी 45 मिनिटे ते एक तास लागतो आणि पुन्हा ब्लॉक होण्याची शक्यता पाच ते सात टक्के असते.

ओसीटी चौकशी स्टेंटिंगची स्थिती मंजूर करते

ऑप्टिकल कोहामान टोमोग्राफी (ओसीटी) कोरोनरी आर्टरीमधील गोठलेल्या कॅल्सिफाईड ब्लॉक्सची सखोल तपासणी करणे शक्य आहे. ओसीटी गाईडेड अँजिओप्लास्टीमुळे स्टेंट बसवण्यात संभाव्य बिघाड होण्याची शक्यता ही कमी होते.

(लेखक सहय़ाद्री हॉस्पिटल, पुणे येथे सीनियर इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्ट आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या