डॉ. अभिनव देशमुख यांनी स्विकारला  पुणे पोलिस अधीक्षक पदाचा पदभार

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांची सुत्रे हाती घेतली. प्रभारी पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते (उपअधीक्षक) यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची पदोन्नतीवर गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे.

देशमुख यांची पुणे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी कोल्हापूर येथे मागील दोन वर्षात अवैध धंद्यांना लगाम घातले होते. त्यांना नुकतेच आंतरिक सेवा सुरक्षा पदकही प्राप्त झाले आहे. गुन्हेगारांवर त्यांचा नेहमीच दरारा राहिला आहे. डॉ. देशमुख यांनी एमबीबीएसचे शिक्षण पुर्ण केले असून त्यांनी कस्टम विभागातही काम केले आहे. ठाणे, एसआरपी, सातारा त्यानंतर गडचिरोलीतही त्यांनी काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या