बीड शहरात सुसज्ज उद्याने उभारणार, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांचे आश्वासन

40

सामना प्रतिनिधी । बीड

शहरातील जालना रोड लगत असलेल्या नेत्रधाम परिसराला नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी भेट देऊन या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्ते, पाईपलाईन आणि सामूहिक मोकळ्या जागेत सुसज्ज असे उद्याना उभारण्याची कामे हाती घेतली जातील असे त्यांनी यावेळी सांगितले.

रविवारी नेत्रधाम परिसरात नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी या भागातील नागरिकांशी संवाद साधला. परिसरात मुख्य रस्त्या लगत असलेल्या 5 अंतर्गत रस्त्याची कामे, सेंट अॅन्स स्कुल ते सत्संग मंदिर, या रस्त्याची कामे तसेच या भागात 10 हजार स्क्वेअर फूट असलेल्या मोकळ्या जागेत उद्यान निर्मितीचे काम व्हावे अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली. परिसरातील नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन ही कामे लवकरच सुरू करण्यात येतील असे ते म्हणाले. यावेळी नागरिकांनी आपापल्या बिल्डिंग भोवती,घरा समोर वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करावे असेही आवाहन त्यांनी केले,यावेळी 100 वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार नागरिकांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या