
अमेरिकेतील प्रसिद्ध दंत चिकित्सक आणि ‘मिसेस युनिव्हर्स ईस्ट अमेरिका’ डॉ. जान्हवी राणे हिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. डॉ. जान्हवीला कान्सच्या रेड कार्पेटवर झळकण्याचा बहुमान मिळाला.
जान्हवी अमेरिकेतील राणेज डेन्टल ग्रुपची सीईओ आहे. नुकतीच तिने सोफिया बुल्गारिया येथील ‘मिसेस युनिव्हर्स पेजेंट’मध्ये भाग घेतला होता. 100 स्पर्धक असलेल्या स्पर्धेत जान्हवीला ‘मिसेस युनिव्हर्स गोल्डन हार्ट’ने सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठsच्या स्पर्धेत अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणारी ती अमेरिकेतील पहिली डॉक्टर आणि हिंदुस्थानी वंशाची स्पर्धक ठरली. या मंचावरून तिने अवयवदानाचा संदेश दिला. जान्हवी स्वतः किडनी डोनर आहे. नुकत्याच झालेल्या कान्स फेस्टिव्हलमध्ये जान्हवीने डिझायनर अंजली फोगाट यांचे कलेक्शन सादर केले.