डॉ. के. एच. गोविंदराज यांनी एमएमआरडीएच्या अतिरीक्त महानगर आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला

403

डॉ. के. एच. गोविंदराज यांनी एमएमआरडीएच्या अतिरीक्त महानगर आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. ते 1995 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी गोविंदराज सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव होते.

13 ऑक्टोबर 2015 पासून कार्यरत असलेल्या अतिरिक्त मेट्रोपोलिटन कमिश्नर संजय खंदारे यांच्या जागी गोविंदराज यांची नियुक्ती झाली आहे. गोविंदराज यांनी आपल्या प्रशासकीय सेवेची सुरवात मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रायगड आणि सांगली जिल्हा परीषद येथून केली. तसेच त्यांनी कोल्हापूर महापालिका आयुक्त आणि सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांनी कर्नाटकमध्ये उत्तर कन्नडचे जिल्हाधिकारी , कारवार आणि बंगळुरू येथील पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय आयुक्त म्हणून कार्यरत होते.

आपली प्रतिक्रिया द्या