प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या फॉर्च्युनर गाडीची चोरी

1008

प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांची फॉर्च्युनर गाडी त्यांच्या निवासास्थानाबाहेरूनच चोरीला गेली आहे. विश्वास यांच्या गाझीयाबादच्या इंदिरापूरममधल्या निवासस्थानाबाहेरून त्यांच्या या गाडीची चोरी झाली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. काळ्या रंगाची ही गाडी मध्यरात्रीनंतर चोरीला गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुमार विश्वास यांनी शुक्रवारी रात्री फॉर्च्युनर गाडी निवास स्थानाबाहेरच उभी केली होती. शनिवारी सकाळी गाडी आपल्या जागेवर नसल्याचे विश्वास यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात गाडी चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. पोलीसांनी तक्रार नोंदवून घेत तपासाला सुरुवात केली आहे. दिल्लीतील प्रसिद्ध व्यक्तीची महागडी गाडी त्यांच्या घराबाहेरूनच चोरीला गेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी पथके बनवून गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. विश्वास यांच्या घराबाहेरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फूटेजही तपासण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या