डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचा बिल गेट्स यांच्या हस्ते गौरव

1450

पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचा बिल गेट्स यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. रविवारी हा पुरस्कार सोहळा दिल्लीतील आयसीएमआर हॉलमध्ये पार पडला.

amte1

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवेमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात आले आहे. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सायरस पूनावाला, डॉ. किरण मझूमदार-शॉ यांचा बिल गेट्स यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या