अमेरिकेला लादेनची माहिती देणाऱ्या पाकिस्तानच्या डॉक्टरचे तुरुंगात उपोषण

4429

आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनची माहिती अमेरिकी गुप्तचर संस्था ‘सीआयए’ला देणाऱया डॉक्टरने तुरुंगातच उपोषण सुरू केले आहे. लादेन पाकिस्तानात लपला असल्याची माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेने त्याचा खात्मा केला होता. शकील आफ्रिदी असे या उपोषणकर्त्या डॉक्टरचे नाव आहे. सोमवारपासून त्यांनी उपोषण सुरू केले असल्याची माहिती आफ्रिदींच्या वकिलाने आणि त्याच्या भावाने दिली.आपल्या कुटुंबीयांना सरकार व पोलिसांकडून त्रास दिला जात असून, त्यांचा छळ होत असल्याचे डॉ. आफ्रिदी यांनी म्हटले आहे. त्याच्या निषेधार्थ हे उपोषण सुरू असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने दिली. बनाकट लसीकरण मोहीम राबविल्याप्रकरणी डॉ. आफ्रिदी यांच्याविरोधात खटला चालविण्यात आला. त्यानंतर 2012मध्ये 33 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली होती. या बनावट लसीकरण मोहिमेत मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकी सुरक्षा यंत्रणांनी 2011मध्ये ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या