‘आमने सामने’चे द्विशतक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खुसखुशीत मनोरंजनाची मेजवानी असलेल्या ‘आमने सामने’ नाटकाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या नाटकाचा 200 प्रयोगांचा टप्पा नजीक येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने रविवार 9 एप्रिल रोजी दुपारी 3.45 वाजता विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात द्विशतक महोत्सवी आनंद सोहळा साजरा होणार आहे.

30 ऑक्टोबर 2019 रोजी ‘आमने सामने’ नाटकाचा शुभारंभ झाला आणि अल्पावधीत समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी या नाटकाचे कौतुक केले. त्यानंतर कोरोनाची लाट आली, या नाटकाचे प्रयोग थांबले. काही दिवसांनी 50 टक्के प्रेक्षक क्षमतेचे प्रयोग सुरू झाले. याच काळात नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा झी पुरस्कार मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाऊनमुळे नाटक ठप्प झाले. आता नाटक सुरू झालंय आणि ‘आमने सामने’चा लवकरच 200 वा प्रयोग होणार आहे.