मनस्वी चित्रकार

149

acrylic-on-canvas-kinjal-12अमूर्त शैलीतील तरीही बोलकी निसर्गचित्रे काढणारी तरुण चित्रकार किंजल त्रिवेदी… तिची चित्रे वैशिष्ट्यपूर्ण तर आहेतच, पण त्यांना आध्यात्मिक टचही आहे.

आपल्या कलेवर मनापासून प्रेम करणारी किंजल त्रिवेदी… चित्रकलेचं तिला लहानपणापासूनच प्रचंड वेड. म्हणूनच या कलेत वेगळं काहीतरी करता येईल का हा तिचा नेहमी प्रयत्न असतो. आत्ता काहीच महिन्यांपूर्वी ती कारने एकटीच लंडनला गेली. त्यावेळी मध्ये तिला 18 देश ओलांडावे लागले. त्यावेळी तिला आलेला अनुभव, दिसलेला नयनरम्य निसर्ग तिने कॅनव्हासवर रेखाटला आहे. त्याचंच प्रदर्शन 8 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत नरीमन पाँइंट येथील कमलनयन बजाज कलादालनात भरले आहे. या मनस्वी चित्रकाराचं वैशिष्ट्य असं की चित्रं रेखाटताना ती कोणताही ब्रश वापरत नाही. हातानेच चित्रे काढते.

स्वतःविषयी माहिती देताना गोड आवाजात किंजल म्हणाली, या पेंटींग्जमध्ये मी बहुतांश ऍबस्ट्रक पेंटींग्ज ठेवली आहे. यातली काही चित्रे आध्यात्मिक विषयांवरही मी बनवली आहेत. भगवदगीता आणि वेदांच्या उपनिषदांमधल्या संकल्पना चितारण्याचा प्रयत्न मी केला आहे, असंही ती स्पष्ट करते. 12 वर्षांपासून किंजल चित्रकलेचं प्रशिक्षण घेतेय. तिच्या वेगळेपणाबद्दल म्हणायचं, तर ती ब्रशने नव्हे, हाताने चित्रे रंगवते. या अनोख्या स्टाईलमुळेच ती इतर चित्रकारांहून वेगळी ठरते. किंजलचं कलाशिक्षण कॅलिफोर्नियाच्या कॉलेज ऑफ आर्ट महाविद्यालयात झालं. नंतर तिने दागिन्यांची सजावट व त्यांचं व्यवस्थापन, प्रकटीकरण याचाही अभ्यास अमेरिकेतील जेमोलॉजिकल इन्स्टिटय़ूटमध्ये घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या